Author Topic: कारे देवा? (अर्थात माळीण घटणे नंतर)  (Read 1043 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....

झाला गाव रीता सारा
आता उरल्या आठवणी,
माय, बाप सारे गेले
ठेउनी चिखलात निशाणी !

कारे असा कोप केला?
सांगशील कारे देवा,
रागा, लोभाचे पण नेले
कुणासाठी येवू गावा?

कधी काळी खेळलो इथे
झोपळा, हुतूतू, लगोरी,
उरली सुध्दा नाही येथे
बांधाया तिरडीस दोरी !

टाकून इथे माती फक्त
मिटवालं अवशेष पसारा,
विसरू कस बाल्य माझं?
देवून गेला गाव सारा !

©शिवाजी सांगळे