Author Topic: एकटाच मी, चालतोय मी.... (ओवीबद्ध कवीता)  (Read 1769 times)

Offline Girish Deshmukh

 • Newbie
 • *
 • Posts: 4
एकटाच मी, चालतोय मी....

एकटाच मी
चालतोय मी
वाट अनन्ताची
तुडवीत...

धुक्यात हरवला
चेहरा जरी हा
नजरा बोचणार्‍या
चुकवीत...

हसत दुष्टतेने
जीवनास माझ्या
धूळ कुचेष्टांची
उडवीत...

विरल्या स्वप्नांच्या
लेवून लक्तरांना
बिरुदे लांच्छनांची
मिरवीत...

जखमा वंचनांच्या
वागवीत अंतरी
स्तोत्रे वेदनांची
आळवीत...

पराभवांचीही त्या
मावंदे घालणा-या
वेड्याच माणसांना
जमवीत...

संपल्या मैफिलीच्या
जागवीत आठवणी
नि:शब्द भैरवी
आळवीत...

(गिरीश देशमुख)
« Last Edit: April 16, 2012, 01:36:12 PM by Girish Deshmukh »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422

Offline muktibodh

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
 • Pradeep S. Muktibodh
कविता खूप छान. आवडली.

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
कविता खूप छान. आवडली. :) :) :)