Author Topic: वाट पाहत होतो त्या सरीची ....(प्रशांत शिंदे)  (Read 672 times)


वाट पाहत  होतो  त्या सरीची
जी ओलेचिंब  करून जाईल ....

ती सर  जी ती माती  ओलावून जाईल
उष्ण झाली  ती माती तिला आता माणसे नको वाटतात
उघड्या पायांनी चालताना  आता  तिचेही  चटके लागतात ....

वाट पाहतो त्या सरीची
ज्याची  गरज  त्या मायला आहे
शोधत  असते अनवानी पायांनी
त्या खापरभर   पाण्यासाठी काटेरी रानात
त्या उघड्या पायांस आहे ....

डोळ्यात पाणी आणतोस तू
बळीराजाला हि रडवतोस त्यास
तरी तुझी  आस आहे
कोरडे पाडून  पिक सारे
त्याच्या लेकरांना ही उपाशी पोटी  निजवतोस
दारिद्र्य   करुनी  त्याच्या    जीवाशी खेळतोस

बंद कर रे ते खेळ जीवाचे
हास्य   तू  आता  देऊन जा
प्रेमाचे  थेंब  आज  तू  देऊन जा ..

वाट पाहत  होतो  त्या सरीची
सुमृद्धी  देणाऱ्या परीची

ये  रे  घना तू  आज तिथेही  बरसून जा
गरीबाच्या  झोपडीकडे तू  एकदा भेटून जा
फाटलेल्या त्या वस्त्रांसंगे स्पर्श   तू करून जा ...
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆