Author Topic: कुठे तरी माझं मन हरवलं (कल्पेश देवरे)  (Read 1439 times)

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male

कुठे तरी माझं मन हरवलं

घरातल्या लोकांच्या आठवणीत
कि त्यांच्यातच होणाऱ्या मतभेदात
मित्रांच्या भेटी गठीत
कि त्यांच्या सोबत घालवलेल्या काळात

मनाच्या छोट्याश्या गाभाऱ्यात
अचानक काहीतरी झालं
आज खरच कुठेतरी
माझं मन हरवलं

शाळेच्या आवारात खेळ खेळलो
शिक्षकांच्या छ्ड्याही खाल्ल्या
रोज अभ्यास करूनही
प्रगती पुस्तकाच्या मात्र खिल्ल्या उडाल्या

का व कसं
असं सारं घडलं
आज खरच कुठेतरी
माझं मन हरवलं 

उच्च शिक्षणाचा दरवाजा
ठोठावल्यावर जाणवलं
कमावलेलं नातं सर्वांशी
त्या पैश्यांपुढे गरबडलं

खूप वेळ गेला
पण व्यवस्थित सारं घडलं
आज खरच कुठेतरी
माझं मन हरवलं

लाख प्रयत्न केल्यावरही
आपलं गणित उलटच वळत
कोण आपलं कोण दुसरं
हे दु:खात असल्यावर कळत

आपल्याच सग्या नात्यात
त्यावेळी दुसरंच कोणी दिसलं
आज खरच कुठेतरी
माझं मन हरवलं

मी यश प्राप्तीसाठी, पुढे जाण्यासाठी
तसेच हुशार ह्या शब्दासाठी झटलो
कुठे जातीभेद तर कुठे मतभेद
ह्या दोघांच्या रुळावर पाय घसरत चाललो

तरीही अपेक्षांच सारं
उपेक्षेत रुपांतर झालं
आज खरच कुठेतरी
माझं मन हरवलं

कवी - कल्पेश देवरे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
chan kavita kalpesh ji

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
धन्यवाद केदार सर...