इतर कविता
(क्रमांक-162)
---------------
मित्र/मैत्रिणींनो,
"इतर कविता" अंतर्गत मी इतर कवींच्या कविता आपणापुढे सादर करीत आहे .
तिला समुद्राच्या दुःखाची जाणिव होत होती…
------------------------------------
ति नेहमी प्रमाणे त्याची वाट
पहायला त्याच ठिकाणी गेली…
ति एकटीच एकाकी दुर उभी
राहून त्याची वाट पहात होती…
एकटक त्या सुर्याकडे अशी
अशी पहात होती की…
तिला त्या सुर्याला काहीतरी
विचारायचं आहे…!
पणं उत्तर कोण देणार…?
समुद्राच्या लाटाही शांत शांत
खुप वेळ झाला…
अजुन हा आला नाही…
अजुन हा आला नाही…?
असा विचार करत करत
ति समुद्राच्या ओल्या वाळूवर
लाटांकडे पहात बसली…
सुर्य कधी बुडून गेला
हे तिला कळलचं नाही…!
ति एकटक त्या लाटांकडे
पहात होती…बसुन.
तिला समुद्राच्या दुःखाची
जाणिव होत होती…
– (कल्पेश फोंडेकर)
------------------
--संकलक-सुजित बालवडकर
--------------------------
(साभार आणि सौजन्य-मराठी कविता.वर्डप्रेस.कॉम)
---------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.03.2023-शनिवार.
=========================================