Author Topic: दुष्काळ (version - 2)  (Read 979 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
दुष्काळ (version - 2)
« on: November 05, 2013, 04:24:01 PM »
'अ' ची अलामत आणि काफिये 'अ'मी अशा प्रकारचे घेऊन गैरमुर्रद्दफ़ म्हणजे रदीफ विरहित गझला लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. परंतु त्यातील नीट माहिती नसल्यानी मी आगदीच तोंडावर आपटलो होतो. नंतर Nilesh Pandit...सरांनी सागितल्या प्रमाणे मी माझी दुष्काळ हि गझल पुन्हा सुधारली आहे आणि ती येथे version - 2 म्हणून post करत आहे. मला माहित आहे कि यात आजूनही बर्याच त्रुटी आहेत. त्या सुधारण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. लगावली जरा त्रासदायक आहे. पण तीही version - 3 मध्ये सुधारून घेईन. तसेच निलेशदांनी सांगितल्या प्रमाणे गा ऐवजी लल आलं आहे ते सुध्धा सुधारण्याचा प्रयत्न करीन. हि गझल त्रुटी सकट येथे पोस्ट करण्याचा उद्देश केवळ हाच आहे कि माझ्या सारख्या नवशिक्या आणि धडपड्या कवींना एका चुकीच्या गझले पासून योग्य होत गेलेल्या गझलेचा प्रवास दिसावा आणि त्यातून त्यांनाही शिकायला मिळावं.
 

 
 गालगा लल गालगागा गाल गागा गालगा 
 
 आजही फसवून गेला मेघ काळा मोसमी
 मरणही मज येत नाही अन म्हणे मी संयमी
 
 फास हा चढवून कंठी साफ झाले गावही
 येन, डॉलर पातला का? हीच मोठी बातमी
 
 ढोर, पोर सुकून मेले सांडला ना थेंबही
 कर्ज ते करणार माफी हाच नारा नेहमी
 
 पोट ना जळले जराही कोंबले काटे जरी
 हाल जे बघण्यास आले वस्त्र त्यांचे रेशमी

 गवत, झाड जळून गेले वाचला ना थेंबही
 देवही करतोच आहे तव चितेची बेगमी
 
 केदार…

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: दुष्काळ (version - 2)
« Reply #1 on: December 08, 2013, 10:33:00 PM »
nice