Author Topic: ***** बा *****  (Read 456 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
***** बा *****
« on: May 28, 2015, 08:22:56 PM »
लोक म्हणायचीत बा ला दारुडा
सडला लिव्हर अनं मेला
त्याचं त्यालाच दुःख माहीत
का पीत होता तो ऐवढा

बा च कामच होत अस
गटारातलं मैल काढायच
तुम्हीच सांगा माझ्या बा न
कस न पिता काम करायच

पण खरं सांगतु तुम्हाला
बा माझा लय दिलदार
कितीबी रोज पिला तरि
रोज खायला आनणार

जरी प्यायचा बा लय दारु
तरी कष्टान संसार उभारलं
पर आमच सुख बघायला
त्याला आयुष्य कमी पुरल

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता