Author Topic: **जाणीव**  (Read 1591 times)

Offline harshal_lagwankar

  • Newbie
  • *
  • Posts: 5
**जाणीव**
« on: March 31, 2013, 03:19:32 PM »
जाणीव

तो जन्मला, तो मी नव्हेच
तो मेला, तो मी नव्हेच ||धृ||

तो विशेष सन्मानाने पदवीधर झाला,
तो मी नव्हेच

त्याला महाविद्यालयातून काढून टाकले,
तो मी नव्हेच ||१||

त्याचे, सुंदर, श्रीमंत तरुणीशी लग्न झाले,
तो मी नव्हेच

त्याने तिला अर्ध्यावर अर्धचंद्र दिला,
तो मी नव्हेच ||२||

तो बहुमताने निवडून येउन मंत्री झाला,
तो मी नव्हेच

तो चपराशी म्हणून टपाल खात्यात चिकटला,
तो मी नव्हेच ||३||

त्याचा “भारतरत्न” म्हणून देशाने गौरव  केला,
तो मी नव्हेच

त्याला निर्घुण गुन्ह्याबद्दल फासावर लटकाविले,
तो मी नव्हेच ||४||

तथापि,  त्याच्यासाठी “मी” देखील “तो” आहे
म्हणून तर “तो” सुद्धा माझ्यासाठी “मी”  च  आहे ||५||


   By शरद लागवणकर
   मुंबई दिनांक ३१/३/२०१३

Marathi Kavita : मराठी कविता

**जाणीव**
« on: March 31, 2013, 03:19:32 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):