Author Topic: *+*बाई*+*  (Read 690 times)

Offline gajabhauchougule

  • Newbie
  • *
  • Posts: 9
*+*बाई*+*
« on: November 30, 2014, 10:26:26 PM »
    *+*बाई*+*
       [गझल)
किती करू वसंताची कदर बाई
सोसला सारा मी बहर बाई

कुणाच्या मालकीची ही बाग आहे
फुलांना काट्यांचा आदर बाई

चेहरे सारेच होते ओळखीचे
माणसांची बेरकी नजर बाई

पावलांना मी दोष काय देऊ
चालण्याची वेगळी लहर बाई

मला सावराया आता वेळ नाही
सारखा अडकतो पदर बाई

कुठे काही मी बोललोच नाही
संशयाचा जाहला कहर बाई


    गजाभाऊ चौगुले
    (पेठ) वडगांव
     ९९७०२०९६३३

Marathi Kavita : मराठी कविता