Author Topic: **विरहाचा हूदंका**  (Read 855 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
**विरहाचा हूदंका**
« on: November 02, 2014, 05:55:42 PM »
वाटेवरी तू सोबत सोडून गेल्यावर,
या शब्दानेच मला साथ दिली होती...
एक अनोळख्या विश्वात नेवून मला,
या कविताशी नाते जुळून दिली होती...

तुझ्या विरहाचा हूदंका गिळून मी,
ते विखूरलेले स्वप्न गोळा करत होतो...
तुटक्या मुटक्या शब्दात का होईना,
पण अबोल भावनेला कवितेत गूफंवत होतो...

माझ्या जीवनातील प्रत्येक पहाट ही,
त्या ओसर साजंवेळी सारखी होती...
शेवटी कितीही उगवलं तरीही ,
पून्हा ती मावळण्याची वेळ होती...

आता नकोशी वाटतात ती माणसं,
ती नाती जे पहिला हवेहवेसे होते...
कारण ह्या अनोळख्या जगातून मला,
आपलीच माणसं हाकालून दिले होते ....!!

© स्वप्नील चटगे.
     (अबोल मी)
दि.02.11.2014
« Last Edit: November 05, 2014, 01:03:31 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता