Author Topic: * रावण *  (Read 667 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* रावण *
« on: October 03, 2014, 11:02:19 AM »
* रावण *
हजारों असतील दोष माझे
कुकर्मी, पापी नाव माझे
दस-याला जाळता पुतळे माझे
आज सांगतो गुण माझे

होत होती पुर्वी यज्ञात
मुक्या प्राण्यांची सर्रास हत्या
लहान असुनही मी थांबवली
हेच आहे पशुप्रेम माझे

तुमच्या नजरेत असेल अधर्मी
पण लक्ष्मणाने जर का
शूर्पणखाला विद्रुप केले नसते
तर रामायण घडले नसते

बहिणीचे रक्षण कर्तव्य माझे
लाज राखणे काम माझे
तिच्यावरील अन्यायाचा बदला घेणे
हेच जीवनाचे उद्देश्य माझे

पळवली सीता जरी मी
आणली लंकेत तरी मी
स्पर्श ना केला कधी
हेच आहे चरित्र माझे

बहिणीसाठी सोन्याची लंका जळाली
प्राणाचीही तमा न केली
भाउ म्हणुन लढलो मेलो
तरीही का बदनाम नाव माझे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.
« Last Edit: October 03, 2014, 11:40:14 AM by कवी-गणेश साळुंखे »

Marathi Kavita : मराठी कविता