Author Topic: * प्रसिद्धी *  (Read 680 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

 • Full Member
 • ***
 • Posts: 881
 • Gender: Male
* प्रसिद्धी *
« on: November 10, 2014, 11:52:26 AM »
* प्रसिद्धी *
कवीपणाचा काहींचा इथे
नुसता बढेजाव असतो
ओळख नसते साहित्याची
अन प्रसिध्दीचा आव असतो

स्वतासाठी स्वार्थ साधणे
हाच त्यांचा डाव असतो
दुस-यांना कमी लेखणे
स्वताचा गवगवा नेहमीच असतो

झाले असतील कार्यक्रम कुठे
फोटोत पहिला नंबर असतो
वाँट्स अप फेसबुकला मग
लगेच अपडेट करत असतो

खरं बोललं कुणी तर
त्याला म्हणे पाय खेचतो
अरे दुस-याला तु तरी
कुठे आपला मानतो

मिळेल जिथे प्रसिद्धी याला
तिथेच हा जात असतो
ठरवुनच तर हा प्रत्येकाशी
खोटं नाते जोडत असतो

उघडं पडेल पितळ म्हणुन
इतर वेळेस गायब होतो
कैमरा दिसताच त्याला
अचानक सामोरा येतो...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: * प्रसिद्धी *
« Reply #1 on: November 10, 2014, 06:19:20 PM »
छान लिहिलेय.. वाह.!

Offline Anil S.Raut

 • Jr. Member
 • **
 • Posts: 205
Re: * प्रसिद्धी *
« Reply #2 on: November 12, 2014, 07:48:17 AM »
बरे झालेेे गणेश ही कविता लिहीली ती ...माझ्याही मनात ही सल
बरेच दिवस झाले खदखदत होती!

Offline कवी-गणेश साळुंखे

 • Full Member
 • ***
 • Posts: 881
 • Gender: Male
Re: * प्रसिद्धी *
« Reply #3 on: November 21, 2014, 09:37:22 AM »
धन्यवाद सतीश आणि अनिल सर माझ्यापण मनात ही सल गेल्या कित्येक महिन्यापासुन होती