Author Topic: * फेसबुकचे चोरकवी *  (Read 600 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 882
  • Gender: Male
* फेसबुकचे चोरकवी *
« on: March 16, 2015, 10:49:38 PM »
* फेसबुकचे चोरकवी *
बाजार मांडलाय नुसता साहित्याचा
फेसबुकवर पुर आलाय कवितांचा
स्वलिखित राहिले फारच लांब
सुळसुळाट आहे कॉपीपेस्ट चोरांचा

दुस-यांच्या कविता मस्तपैकी ढापुन
मुळ कवीचे नाव उडवुन
गर्लफ्रेंड, मैञिंनींना व्हॉट्सअप करुन
स्वताच्या नावाने पोस्ट करायच्या

झालाच कधी सामना जर
प्रत्यक्षात मुळ कवीशी तुमचा
तर कचरा होईल इज्जतीचा
म्हणुन सोड नाद कॉपीपेस्टचा

अरे फेसबुकचा चोरकवी होण्यापेक्षा
चारचौघात मान खाली घालण्यापेक्षा
तु सम्राट हो स्वलिखिताचा
आणि पाईक हो साहित्याचा.
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता


मीलन

  • Guest
Re: * फेसबुकचे चोरकवी *
« Reply #1 on: March 23, 2015, 10:10:59 PM »
तु सम्राट हो स्वलिखिताचा
आणि पाईक हो साहित्याचा.

होणार आता शेकडो "सम्राट" स्वलिखिताचे
आणि "पाईक" साहित्याचे.