Author Topic: * सण पोलीसाचा *  (Read 442 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 882
  • Gender: Male
* सण पोलीसाचा *
« on: June 03, 2015, 10:25:24 AM »
* सण पोलीसाचा *
पोलीस आहे म्हणुन काय झालं
शेवटी तो ही माणुसच ना ?
तुमच्या आमच्या सारख्या शेवटी
त्यालाही भावभावना आहेत ना ?

बायका पोरांचा प्रपंच देवाने
त्यालाही दिलाच आहे ना ?
दारात बसुन छकुली बापाची
रोज वाट बघतच असेल ना ?

आई सांग बघु बाबांनी कधी
आपल्या सोबत कोणता सण
साजरा केलाय ग ? असा प्रश्न
प्रत्येक पोलीस मुलगा विचारतच असेलना ?

त्याच्या शाळेतल्या कोणत्याच कार्यक्रमात
त्याचा बाबा कधीच नसतो
इतर मुलांचे बाबा आलेले बघुन
त्यालाही रडु येतच असेल ना ?

काय असतो हा बंदोबस्त नेमका
नक्कीच चक्रव्युह तर नसेल ना
कारण अजुनपर्यंत तरी बाबांना
यातुन बाहेर पडताच आले नाही ना ?

देवा असेल कोणी आमचा वाली
तर आज अबोली हाक ऐकु दे ना
एकतरी सण आम्हाला आमच्या
पोलीसबाबा सोबत साजरा करु दे ना !
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता