Author Topic: .#नियतीचा_खेळ.....  (Read 1163 times)

Offline raj4u

  • Newbie
  • *
  • Posts: 23
.#नियतीचा_खेळ.....
« on: July 12, 2014, 05:58:18 PM »
.#नियतीचा_खेळ.....
 
 सुखाने चालले होते
 ऋणानुबंधनाचे नाते..
 वाट चुकले हे रस्ते
 अनोळखी झाले नाते..!
 
 काय गुन्हा घडून गेला
 नशिबानी  दोषी ठरविले..
 नात्या मधले चांदण मणी
 विणता विणता विखुरले..!!
 
 आयुष्याचे चक्र चालते
 स्वप्नामागुन सत्य धावते..
 अधांतरी पडते पाऊल
 नियती कसा खेळ खेळते..!!!
 
           © राज पिसे**
« Last Edit: July 19, 2014, 07:03:50 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता