पुन्हा दहशत पुन्हा स्फोट
कोणाला काय फरक पडतो
या मुंबईत काय चाललय
हे आता नेहमीचच झालय
११-७, १२-३, २६-११, १३-७
आता रोजच दहशत रोजच स्फोट
कॅलंडर आमच भरतच चाललय
हे आता नेहमीचच झालय
स्फोटामध्ये नेते कधीच मरत नाहीत
टी.वि. वर त्यांचे नातलग रडताना कधीच दिसत नाहीत
चाकरमन्यांचाच इथे मरण झालय
हे आता नेहमीचच झालय
अजूनही येतात लोंढे परप्रांतीयांचे
निवडणुकीत महत्त्व त्यांच्या मतांचे
म्हणूनच मृत्यूच हे तांडव चाललय
हे आता नेहमीचच झालय
कुणी वर्षानुवर्ष कोमात गेलय
कुणाचा शीर धडापासून वेगळा झालय
सगळ्या शहराच आता स्म्शान झालय
हे आता नेहमीचच झालय
ट्विन टॉवर्स उडून अकरा वर्षा झाली
तिथून नंतर एकही स्फोटाची बातमी नाही आली
आमच्याच देशाला दहशतीने पोखरलय
हे आता नेहमीचच झालय
अपराध्याला इथे कधीच फाशी होत नाही
गुन्ह्यावर कायद्याची कधीच सरशी होत नाही
सिमी, अल-कायदा, मुजाहीदीन यांचा पेव फुटत चाललय
हे आता नेहमीचच झालय
कवी- अमोल कशेळकर