Author Topic: #MoidiinUS  (Read 558 times)

Offline shaan@5

  • Newbie
  • *
  • Posts: 9
#MoidiinUS
« on: September 29, 2014, 11:15:45 PM »
मी कधीच भाषण ऐकत नव्हतो...!!!

 

मला माहित नाही माझा नेता कसा असतो

जो कधीच बोलत नाही तो असतो

कि जो नेहमी बोलतो तो असतो

या आधी …. मी कधीच भाषण ऐकत नव्हतो

 

शाळेत निबंध लिहित होतो... मनात साठवत होतो

जर पंतप्रधान झालो तर ….स्वप्न पाहत होतो

पंतप्रधान कधीच बोलत नाहीत … असंच समजत होतो

या आधी …. मी कधीच भाषण ऐकत नव्हतो

 

पंतप्रधान म्हणजे कटपुतली असंच समजत होतो

तिला न विचारता बोलणे म्हणजे पाप समजत होतो

गंगेला पाहताना , मनापासून रडत होतो

या आधी..... मी कधीच भाषण ऐकत नव्हतो

 

आज कळलं न बोलणारे कधी भारत बदलू शकत नव्हते

ज्यांना मत दिलं ते फक्त पोपटपंची माणसं होते

अभिमान वाटतो माझा नेता आज परदेशात हिंदीतून बोलतो

चला चांगलच झाल ...

या आधी मी कधीच भाषण ऐकत नव्हतो

 

#ModiInUs

Thanks and Regards,

 

Shashank Pande

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
Re: #MoidiinUS
« Reply #1 on: September 30, 2014, 08:05:29 AM »
शशांक जी,
नेमके वर्मावर बोट ठेवले आहे आपण!
दुखरी नस पकडली की वेदना जाणवणारच
आणि या कवितेतून देशवासियांना ती जाणवावी!

पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा!!!

Offline shaan@5

  • Newbie
  • *
  • Posts: 9
Re: #MoidiinUS
« Reply #2 on: September 30, 2014, 07:48:21 PM »
dhnyawad sir..!! :)