Author Topic: प्रत्येक जण आपल्या जीवनात कवी असतो..  (Read 1824 times)

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतो..

जसा रात्री चंद्र अन  दिवसा रवी असतो

तसा प्रत्येक जण कधीनकधी जीवनात कवी असतो..

 

सुख दुखाचा वाटा सगळ्यांना सारखाच असतो..

दुखाच्या अंती सुखाचे यमक जोडतच  असतो..

कधी भुताच्या अश्रुनी वर्तमानाचे कागद ओले करतो

तर कधी सुखाच्या लेखणीने तिथेच रेघोट्या ओढतो

पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतो..

 

कधी डोळ्यात पाण्याचा डोह वाहत असतो

तर कधी आनंदात खगासोबत   गाणे गातो

कळत नकळत आयुष्याचा कंटाळा येतो

मग आठवणीचा घोट घेऊन पुन्हा उत्साहित होतो

पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतो..

 
ती व्यक्ती माझी म्हणून बोट ठेवतो

पण कोणी दुसरी व्यक्ती तिची हे तो विसरतो

मग पुन्हा नशिबाला शिव्या देतो

दूर राहायचे म्हणून एकांतवास सोसत राहतो

पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतोप्रेम दुसऱ्यावर पण लग्न तिसऱ्यासोबत  करतो

काही दिवसांनी तिचावर पण प्रेम करू लागतो

डगमगणाऱ्या चाकाला  अजून एका चाकाचा आधार देतो

कधी हसत  तर कधी रडत संसार करतो

पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतोआता आयुष्याचा bonus म्हणून काही दिवस काढतो

खोट्या बत्तीशी ने खोटे हास्य दर्शवतो

आयुष्यभर केलेल्या जीवनरुपी  कवितेचा आढावा घेतो

अन शेवट म्हणून एक पूर्णविराम देतो 

 पण जीवनरुपी ओळ तो स्वछंदपणे  पूर्ण करतो..

कारण प्रत्येक जण आपल्या  जीवनात कवी असतोजसा रात्री चंद्र अन  दिवसा रवी असतो

तसा प्रत्येक जण कधीनकधी जीवनात कवी असतो

                                                                                             .........मंदार बापट

Marathi Kavita : मराठी कविता


Sagar Deshmukh

 • Guest
mst...purn aayushya tyat rangwle ahe tu...
chan kawita..

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
outstanding kavita mandarji...
hatsoff ya kavitesathi..
khupach chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
thanks sagar...

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
dhanywad shrikantji...
tumcha mulech lekhnit shakti yete :)

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
कविता छान आहे पण दीर्घ फार आहे .कमीत कमी शब्दात अधिकाधिक देता आले तर पहा. :)

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
dhanyawad Vikantji...ho khup mothi zali...me prayatn krel thank u....:)

Kiran Patil

 • Guest
Speechless....ati uttam

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Dhanyawad Kiran