Author Topic: कोळीष्टकं  (Read 592 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
कोळीष्टकं
« on: November 23, 2012, 03:39:53 PM »
सिलिंग फ्यानवर
जमली कोळीष्टकं
……………………"साफ करुया"
……………………तुझा हट्ट 

झटकता कुंच्यांनी
चिकटली सिलिंगला
……………………"बघितलंत आता!
……………………कठीण काढायला"

मनात आठवलं
अचानक मला
……………………वागणं माझं
……………………चुका माझ्या

मी निष्ठुर
फटकारत राहिलो
……………………शब्दांच्या कुंच्यांनी 
……………………नेहमीच तुला

तू तरीही
धरून मला
……………………जळमटा  सारखी
……………………चिकटून मला

वाईट वाटतं
आता आठवून
……………………काय मिळवलं
……………………तुला दुखावून

"डोळ्यांत पाणी?"
"कुठे काय?!
……………………असेल कचरा
……………………दुसरं काय?"


केदार...
« Last Edit: November 23, 2012, 03:44:31 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Re: कोळीष्टकं
« Reply #1 on: November 23, 2012, 05:00:13 PM »
mst

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: कोळीष्टकं
« Reply #2 on: November 23, 2012, 11:55:16 PM »
"डोळ्यांत पाणी?"
"कुठे काय?!
……………………असेल कचरा
……………………दुसरं काय?

मनास भिडली .