Author Topic: सप्तमीच्या चंद्राला आज...  (Read 649 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
सप्तमीच्या चंद्राला आज
           ग्रहण लागले आहे
तळपणारे सूर्य -बिंब
        काळवंडून गेले आहे
दुखावलेला वारा
        थबकुन लपला आहे
कारण आज देव
        निर्घृण झाला आहे ।

सृष्टी सुद्धा दुःखाने
        अश्रूं गाळते आहे
ढगाळलेले आभाळ
       उदास झाले आहे
संगीताचा सूर हि
       बेसूर झाला आहे
कारण आज देव
       निर्घृण झाला आहे ।।रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_8.html

Marathi Kavita : मराठी कविता