Author Topic: वखवखल्या विक्राळ जगी या  (Read 941 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
वखवखल्या विक्राळ जगी या
« on: December 23, 2012, 07:36:04 PM »
वखवखल्या
विक्राळ जगी या
पडला प्रश्न.

कसे ठेवावे
प्रियतम आपुले
फूल जपून.

चिंतेने मग
भयव्याकूळ झाले.
ते प्रियजन

हवे फुलाया
नच येत ठेवता
बंद करून .

पण बाहेर
भेसूर नराधम
क्रूर भयाण.

राक्षसगण
वा श्वान पिसाळले
बसले टपून.

कोण तयाला
करतील शासन
विलंबाविण.

कुकर्मा आधी
अविचारी हात ते 
टाके ठेचून.

शिवरायांचे
न्याय निष्ठुर जसे
होते शासन.

हात कापरे
अन बधीर व्हावे
दुर्जन मन.

असेच काही
भर रस्त्यात वा
यावे घडून.

तया पाहून
मग गळून जावे
त्राण तमाचे.

आणि चुकून
नच विचार यावे
मनी पापाचे.

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: वखवखल्या विक्राळ जगी या
« Reply #1 on: December 24, 2012, 12:54:50 PM »
विक्रांत आगदी खरं लिहिलं आहेस.  
खरेच व्हावे
शासन नाराधामां
भर रस्त्यात
 
पाहून हाल
भयाच्या हि सुटावा
अंगास कंप   

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: वखवखल्या विक्राळ जगी या
« Reply #2 on: December 24, 2012, 08:34:35 PM »
या बद्दल दुमत नाही.धन्यवाद

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: वखवखल्या विक्राळ जगी या
« Reply #3 on: December 25, 2012, 12:24:36 PM »
देवाने आम्हा स्त्रियांना इतके दुर्बल का बनविले आहे कि अश्या वेळी आम्ही आमचे स्वरक्षण हि करू शकत नाही .....  आम्ही स्त्रिया इतक्या असहाय्य का ? :'( ...

त्या मुलीसोबत जे घडले ते वाचून अंगावर काटा उभा राहिला... उद्या असे काही आपल्या बरोबर घडले तर या विचाराने नकळत डोळ्यात पाणी आले... कसं सहन केले असेल त्यावेळी तिने ते ... तिचा प्रियकर हि त्यावेळी तिच्यासाठी काही करू शकला नाही... दोघांच्या मनाची परिस्थिती किती विचित्र असेल त्या घटनेनंतर....
माझ्या नवर्याला पण
वखवखल्या
विक्राळ जगी या
पडला प्रश्न.
कसे ठेवावे
प्रियतम आपुले
फूल जपून.

अशांना शिक्षा एकवेळ पिडीत मुलीच्या मनावर थोडावेळ फुंकर घालेल पण कायमचे ओरखडे कधीच पुसून टाकू शकणार नाही .. :(

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: वखवखल्या विक्राळ जगी या
« Reply #4 on: December 26, 2012, 04:24:25 PM »
मला वाटते माणसातील पशुवृत्ती एवढ्या सहजासहजी नष्ट होणार नाही .कठोर कायदा बराच आळा घालू शकेल .पण संपूर्ण  समाजाची नितीमत्ता सुधारण्यासाठी केलेले प्रयत्नच जास्त  उपयोगी पडतील .तसेच शालेय जीवना पासून मुलींना स्वसंरक्षणाचे  शिक्षण अनिवार्य करावे.या शिवाय टीवी  सिनेमा जाहिराती  यात स्त्रियांना जे एक वस्तू म्हणून दाखवले जाते ते बंद व्हावे ,इंटरनेट आदी मेडियात पोर्नोग्राफी सहज उपलब्ध आहे ते बंद व्हावे .अश्या अनेक छोट्या परंतु बेसीक मुद्यावर लक्ष्य केंद्रित केले तर फरक पडेन असे मला वाटते .या निमित्ताने झालीली एकजूट हे त्यातल्या त्यात समाधान देते ,
      त्या दोघांच्या मनांच्या परिस्थितीची कल्पनाही करवत नाही .उध्वस्त हा शब्द हि लहान वाटतो..
असो .धन्यवाद
« Last Edit: December 26, 2012, 04:25:51 PM by विक्रांत »