Author Topic: भोगवस्तू  (Read 1399 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
भोगवस्तू
« on: December 23, 2012, 10:59:48 PM »
भोगवस्तू

 रात्र झाली की
 त्यांच भोगण सुरु होतं
 माझं काळीज न मनाच
 विखुरण सुरु होतं
 ते बलात्काराच दृश्य
 नजरेसमोर फिरत असतं
 ते वेदनांचे चित्कार
 एकेक नस तोडत असतं
 हवं तसं भोगून
 त्यांच्या वासनेन कुस्करलेल
 ते रक्ताळलेलं शरीर न मन
 नग्न अवस्थेत रस्त्यावर फेकलेलं
 कां भोगतोय मी यातना
 मी तर पुरुष आहे
 पण स्रीच्या पोटी जन्मलो
 तिचे काही ऋण आहे
 कां पुरुष स्रीकडे फक्त
 भोगवस्तू म्हणून पहातो
 ती हि आहे माणूस
 हे कां विसरून जातो
 मान्य भिन्न लिंगी म्हणून
 स्रीचे आकर्षण न कुतूहल असते
 म्हणून कां कुणी तिच्या मनाविरुद्ध
 असे हिंस्र वागायचे असते
 खरा पुरुषार्थ न मर्दुमकी
 स्रीच मन जिंकण्यात आहे
 तिचं जीवन फुलवून
 जगणं सुंदर करण्यात आहे
 समस्त पुरुष वर्गाला
 मी एकच घालतो साकडे
 फक्त भोगवस्तू म्हणून
 नका पाहू "स्री" कडे
 देह सोडून खूप काही
 सुंदर आहे तिच्यात
 तिच्यावर प्रेम करून
 रहा तिच्या हृदयात .

 संजय एम निकुंभ , वसई
 दि. २१.१२.१२ वेळ : स.८ वा.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: भोगवस्तू
« Reply #1 on: December 23, 2012, 11:41:14 PM »
agree with u.........

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: भोगवस्तू
« Reply #2 on: December 24, 2012, 01:00:55 PM »
hmnhmnhmhn :(

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: भोगवस्तू
« Reply #3 on: December 25, 2012, 12:30:37 PM »
प्रत्येक पुरुषाचे विचार जर तुमच्या विचारांसारखे झाले तर किती बरं होईल .... बलात्कार सारखा शब्द पुन्हा कधीच कानावर पडणार नाही...

Offline rjbendre

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: भोगवस्तू
« Reply #4 on: December 26, 2012, 07:05:12 AM »
apan manus ahot. pashu nahi he purushane lakshat thevaylaq have

Amol Shinde

 • Guest
Re: भोगवस्तू
« Reply #5 on: December 26, 2012, 12:08:05 PM »
Dear Sir,

I like ur poem. U have mention real condition of life. we are agree ur thinking.


Thanks & Regards,

Amol Shinde

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: भोगवस्तू
« Reply #6 on: December 26, 2012, 01:48:25 PM »
outstanding kavita...
vachtana sudhha angavar kata yeto..
apratim...
mazyakadun ya kavitesathi salam...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Arun M. Deshmukh

 • Guest
Re: भोगवस्तू
« Reply #7 on: December 29, 2012, 04:13:00 PM »
श्रीयुत निकुंभ

तुमच्या कविता गंभीर विषयाला सहजतेने हात घालतात. त्या द्वारे माणसाच्या मनातील मालिन्य दूर करण्याचा प्रयत्न करतात.

बोथट झाल्येल्या सामाजिक जाणिवांना धार देणाऱ्या अशाच आशय गर्भ कविता करीत रहा.

तुमच्या कविता वाचून पुरुष जात सुधारेल कि नाही हे सांगता येत नाही पण स्त्री वर्गाचा आम्हा पुरुषांकडे पशु म्हणून पाहण्याचा जो
दृष्टीकोन हल्ली वाढीस लागत आहे (अर्थात आमच्याच कर्तृत्वामुळे ) कदाचित तो अंशत: बदलण्यास तुमच्या कविता सहायभूत होतील.

अ.म.देशमुख