Author Topic: आठवणीची कविता ....  (Read 1302 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
आठवणीची कविता ....
« on: January 05, 2013, 02:56:56 PM »
आठवणीची कविता ....

 एक

आठवण  एक  पक्षी आहे ,    पण  त्याला  पंख  नाहीत ,
 आठवण  एक  पत्र  आहे ,    पण  त्याला  पोच   नाही,
 आठवण  एक भाषा  आहे ,    पण  त्याला  शब्द   नाहीत,
 आठवण  एक   प्रमेय आहे ,    पण  त्याला  सिद्धता  नाही,
... आठवणीत कधी कधी उदासीनता असते  कृतीची
    अभाव असतो अभिव्यक्तीचा ,
अन  लोक मग प्रश्न विचारतात ...
का रे,  तुला तर हल्ली आठवणच  येत नाही  आमची ? 
 
दोन

 आठवण  म्हणजे एक  'साठवण ' असते
आपल्या लोकांचा स्नेह जपून ठेवणारी
कधीही , कुठेही  परत अनुभवण्यासाठी ...
कधी कधी एक प्रश पडतो  मला
आंब्याचे अन फणसाचे 'साठे' का घालतात?

----  वैभव वसंत  जोशी ,  अकोला (ह.मु  पुणे )

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आठवणीची कविता ....
« Reply #1 on: January 06, 2013, 04:43:54 PM »
hmnhmn... chan. shevatachi ol samajali nahi.......