Author Topic: बरसेल कधी तिच्या पदरी दयाघन  (Read 571 times)

Offline GANESH911

  • Jr. Member
  • **
  • Posts: 124
  • Gender: Male
  • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
भेगाडल्या जमीनीला दोन थेंबांची आस
त्यात उगवेल कसा अंकुराचा उल्हास

सोसली उन्हं तिने,कधी पाऊस ना झाला
तिच्या सवे रडायला कुणीही ना आला

उन्हं कधी सरली नाही,ना कुस कधी फळली
सारीपाटाच्या खेळातली रित ना तिला कळली

सोसले सारे फाळ,पण मिळे ना आभाळ
तहानली राहीली जगी सदा सर्वकाळ

कोरडी ती माती तिचे तहानले मन
बरसेल कधी तिच्या पदरी दयाघन

गणेश शिवदे