Author Topic: आभार मानले मी  (Read 1138 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आभार मानले मी
« on: February 22, 2013, 08:21:35 AM »
मेल्यावरी जगाचे
   आभार मानले मी
जाऊ दिले मला हे
   उपकार मानले मी
तेव्हां जरी जरासा 
   मी जिवंत होतो
सारेच बोल खोटे 
   उपचार मानले मी ।
केव्हाच सांत्वनासाठी 
   सोडली मी अपेक्षा
अपुल्याच आसवांना 
   आधार मानले मी
माझ्याच भावनांशी 
   आजन्म बोललो मी
प्रेमाच्या भुलावणीला 
   संसार मानला मी ।
आयुष्य संपताना 
   इतकीच खंत होती
बेवफा मज सखीला
   दिलदार मानले मी
माझ्या पराभवाची 
   समजूत घातली मी
जे वार खोल गेले 
   ते यार मानले मी ।। रविंद्र बेंद्रे 

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/02/love-poem_13.html

Marathi Kavita : मराठी कविता