Author Topic: रात्रीच्या कुट्ट अंधारांत  (Read 1003 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
रात्रीच्या कुट्ट अंधारांत
       दिवस माझा उजाडतो
मनांत लपलेली  सारी
        स्वप्नें तो दाखवतो ।
स्वप्नांची लांब  पंक्ती
             संपता संपत नाहीं
विचारांचे धावणे
           थांबता थांबत नाहीं ।
रंगीत तशीच रंजित
       स्वप्नें पडत असतात
दुःखी आणि निराश
       विचार येत असतात ।
रात्र सारी संपते परि
       स्वप्ने काहीं संपत नाहीं
विचारांच्या गतिला
      खीळ काहीं बसत नाहीं  ।
जीवनांतील  क्षण सारे
   रात्रीच्या अंधारांत दिसतात
विचारांची भुतेही
      त्याभोवती फेरा धरतात ।
एकाकी पण जीवनाचे
      दिवसा पूर्ण जाळत असते
रात्रीच्या अंधारांत ते     
      जास्त भयाण होत असते ।
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/02/sad-poem_20.html
« Last Edit: February 27, 2013, 05:10:08 AM by Sadhanaa »