Author Topic: आई तुझी आठवण  (Read 819 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आई तुझी आठवण
« on: March 02, 2013, 09:06:19 AM »
क्षणा क्षणाला हर घटकेला 
               आई तुझी आठवण येते

कुणी प्रेमें मज जवळ घेईना

विचारपूस  आणि करे ना

कुणी मज प्रेमाने भरवेना

                म्हणुनि भुकही उडूनि जाते ।

कोण फिरविल हाय तुजविण

अंगाई आता म्हणेल कोण

वाट कोण पाहिलं तुजविण

                म्हणुनि शाळेतून येऊ नये वाटते ।

तव प्रेमाचा स्पर्श आगळा

शब्दांतील तो भाव वेगळा

आठवितो तो मला ग सगळा

                 परि न मजला तूं कुठे न दिसते ।

आता आई कुणा म्हणू मी

प्रेम निवार्या कुठे जाऊ मी

वाट तुझी किती पाहूं मी

                  वाट पहाता मनांत तुटते ।

असशील तेथुनि ये धावुनि

कडेवर घे मला उचलुनि

निजवी अन अंगाई गाउनि

                  त्याविना मज झोंप न येते ।

तुला कधी न त्रास देईन

हट्ट सुद्धा न कधी करीन

तुज मनासारखे वागीन

                वचन आता देतो तुला ते ।

   क्षणा क्षणाला हर घटकेला   
                आई तुझी आठवण येते ।।
रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/02/sad-poem.html

Marathi Kavita : मराठी कविता