Author Topic: चक्रव्यूह  (Read 644 times)

Offline swatium

  • Newbie
  • *
  • Posts: 34
चक्रव्यूह
« on: March 08, 2013, 08:39:56 AM »
चक्रव्यूह

महिला दिन
करूया का साजरा ?
डोळ्यासमोर...
भयकंपित करणारी  निर्भया  येते
मानवी देहात वावरणाऱ्या
पशूची घृणास्पद खदखद ऐकू येते  ...
TV वर तळाशी येणाऱ्या बातम्या
 सर्वत्र बोकाळलेल्या
वासनेचा बळी ठरलेल्या कुस्करलेल्या 
१० कधी १२ तर कधी ६वर्षाच्या
भावी महिला
आजच्या कोवळ्या कालिका
कोमेजून मिटून जाताना
त्यांचा हृदय पिळवटून टाकणारा टाहो ऐकून
कानाचे पडदे फाटतात ....
रंगीबेरंगी घागरी घेऊन घाम गाळत
पाण्यासाठी वणवण करणाऱ्या बेरंग चेहेऱ्याच्या 
माझ्या भगिनींची भेगाळलेली पावले
हृदयाला घर पाडतात ...
देशाला स्वातंत्र्य मिळून  एवढी वर्ष लोटून सुद्धा
अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या
शिक्षणाचा सूर्योदय न बघितलेल्या
किवा त्यासाठी मैलोनमैल पायपीट करणाऱ्या
कोवळ्या जीवांचे केविलवाणे डोळे दिसतात.....
मन खिन्न सुन्न होते कविता लिहिताना सुद्धा
शब्दांना कापरे भरते ..
पेनला दातखीळ बसते
भावना गोठतात .....
अशातच कोणीतरी नाजूक आवाजात समजावते
....आशेच्या किरणाच्या धुसर प्रकाशात ,
मनाच्या झारीख्यातून कोणीतरी डोकावते
बदलेल नक्कीच हे बदलेल
उत्तरेच्या गर्भात
अभिमन्युने  जसे
चक्रव्यूह भेदण्याचे शिक्षण घेतले 
तसेच आम्हीही ऐकतोय
आजच्या परिस्थितीचे 'चक्रव्यूह'
ते भेदण्याचे मार्ग आत्मसात करतोय
तुमच्या विचारांचे संक्रमण होतेय
आमच्या मेंदूत
पण.. यासाठी
आम्हाला उमलू दे  ..या जगात येउदे
तोपर्यंत तुम्हाला महिलादिनाच्या भरपूर शुभेच्छा !
.........................................स्वाती मेहेंदळे 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: चक्रव्यूह
« Reply #1 on: March 08, 2013, 12:51:27 PM »
happy women’s day