Author Topic: मी बेशिस्त …  (Read 2075 times)

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
मी बेशिस्त …
« on: March 09, 2013, 08:41:44 PM »
मी बेशिस्त. …
बिनघोर जीवन माझ …….
बिनधास्त माझ जगन
संतापलेल्या आयुष्याच्या
वाटोळीत झालोय मी मग्न. …

उजेडाचा राग मला ……
अंधारावर प्रेम
वाट हरुवून बसलोय
मी धरून मृत्यू चा नेम

वायीट सवयींच्या आडोश्यात
मी केला स्वतःवर घात ….
स्वप्नमधुर झालेल्या जीवनात
मी सोडली सर्वांची साथ.

कोणती माझी आशा
आणि कसला माझा स्वार्थ
द्वेषाच्या उंबरठ्यावर बसून
मी शोधतोय जगण्याचा अर्थ.

व्यर्थ माझे दिवस
अन व्यर्थ माझ्या रात्री
पुण्या सोबत वैर करून
मी केली पापाशी मैत्री

तिथे पण नाही टिकला
माझ्या मैत्रीचा धागा
न कळतच पुण्य करून
मी दिला पापाला दगा

शब्द नाहीत मजपाशी
मी व्यक्त करू कसे
माझ्या जीवनाच्या व्याखेवर
आता उमटलेत मृत्यचे ठशे

भूक माझी संपली
आता लागली आहे तहान
पिण्या साठी पण आता
सागर वाटतोय लहान

आसवाच्या सिंचनाचे
घेत आहे मी घोट
तरीपण का बरे
थरथरत आहेत हे ओठ

थरथरत्या ओठांमध्ये
वीज ठेवून मी चालतोय
पाप-पुण्य स्वार्थ-घात
यातच आयुष घालतोय

मृत्यूच पण भय आता
राहील नाही मनाला
काय नाव देऊ ह्या
बेशिस्त वागणुकीला

बळीराम भोसले
« Last Edit: March 09, 2013, 08:57:26 PM by balrambhosle »

Marathi Kavita : मराठी कविता

मी बेशिस्त …
« on: March 09, 2013, 08:41:44 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

swati123

 • Guest
Re: मी बेशिस्त …
« Reply #1 on: March 10, 2013, 11:11:19 PM »
ashi pn kunachi life aste ka..khup bhayankar ahe..bhiti watate re

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी बेशिस्त …
« Reply #2 on: March 11, 2013, 09:05:37 AM »
kavita chan aahe!

pramod aradwad

 • Guest
Re: मी बेशिस्त …
« Reply #3 on: March 11, 2013, 02:30:51 PM »
kay mitra hi tar majhya jiwanashi lagun ahe

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: मी बेशिस्त …
« Reply #4 on: March 11, 2013, 07:05:07 PM »
thanx my dear......

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: मी बेशिस्त …
« Reply #5 on: March 11, 2013, 11:52:07 PM »
balrambhosle भाऊ, खूपच छान! कविता वाचताना पहिल्यांदाच अस झाल असाव, कि मी यमक, शब्दरचना, मात्रा  या पलीकडे जाऊन एका वाईट व्यसनात अडकलेल्या, बरबाद झालेल्या माणसाची दुख:द कहाणी ऐकली.
असा विषय खूप छान मांडलास. बाकी नुसती कविता म्हणून इतरांनी ह्या कवितेला 'छान' म्हणलच आहे; त्यामुळे त्या बद्दल वेगळी स्तुती मी करत बसण्याची गरज नसावी बहुदा......

चुकली जरी वाट
या परत फिरून,
नाहीतर जन्म सारा
जाईल सडून......
« Last Edit: March 11, 2013, 11:52:32 PM by Madhura Kulkarni »

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: मी बेशिस्त …
« Reply #6 on: March 12, 2013, 11:07:20 AM »
thanx.....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मी बेशिस्त …
« Reply #7 on: March 15, 2013, 10:28:54 AM »
भूक माझी संपली
आता लागली आहे तहान
पिण्या साठी पण आता
सागर वाटतोय लहान

मित्रा
सागर लहान नसतो!
सागर नेहमीच अथांग असतो!
त्यात खोलवर जाऊन बघ!
तुला पणीच पाणी दिसेल!
तेव्हा शमेल तुझी तहान!
नसशील कधीच तू तहानलेला!

जसं तू कविता छान लिहितोस!
तसंच जीवनाचा आस्वादही भरभरून घे!


मिलिंद कुंभारे

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: मी बेशिस्त …
« Reply #8 on: March 21, 2013, 04:53:52 PM »
 :) apratim... :)

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: मी बेशिस्त …
« Reply #9 on: May 21, 2013, 08:28:05 AM »
Thanx ;D

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):