Author Topic: जाऊन देत नां पण......आपल्याला काय पडलंय?  (Read 754 times)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
जाऊन देत ना......
आपल्याला काय पडलंय?


स्त्रियांवरचे अत्याचार,
सामुहिक बलात्कार,
भ्रष्ट लोकांचा सत्कार,
खरेपणाचा धुत्कार......

हातावर हात ठेवून सरकार गाफील बसलय,
जाऊन देत ना पण.... आपल्याला काय पडलंय?
श्रीमंतांकडे पैसा वाढतोय,
गरीब अजुनी उपाशी झोपतोय,
शेतकरी कर्जापायी मारतोय,
कर्जाचे हफ्ते त्याचा परिवार भरतोय,

बेरीज करूनही हाती शून्यच उरतय.....
जाऊन देत ना पण.....आपल्याला काय पडलंय?हक्कासाठी स्त्री झटतेय,
कोर्ट मात्र तारीख पुढेच रेटतेय,
क्षणक्षण ज्ञायासाठी लढतेय,
खरतर गजाआड ती स्वतः:च झुरतेय,   

माणसाच माणूसपण हवेतच विरतंय......
जाऊन देत ना पण.....आपल्याला काय पडलंय?अनधिकृत म्हणत पडतायत घर,
काढतायत साऱ्या लोकांना रस्त्यावर,
स्वच्छतेचा काही पत्याच न्हाई,
पण त्याबद्दल कुणी काही बोलायचं नाही.....

पोपटपंची नुसती, वरीस असच सरतय.....
जाऊन देत नां पण......आपल्याला काय पडलंय?


Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
मधुरा
खूपच छान!


मिलिंद कुंभारे  :) :) :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
ज्याच जळतं त्यालाच कळतंय
आत्ता तरी आपल ठीक चालतय 
म्हणून म्हणतो,
जाऊन देत ना पण.... आपल्याला काय पडलंय?

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Thanks Milind Dada,

केदार दादा,

छान आहेत ओळी.


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):