Author Topic: सल मनातला…  (Read 787 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
सल मनातला…
« on: April 17, 2013, 11:51:01 PM »
सल मनातला…

असलाच तर असू द्यावा मनामध्ये एखादा 'सल'
गोठवणारा , रापणारा , टोचणारा , करणारा हतबल!
 असू द्यावा मनामध्ये एखादा 'सल'
सल म्हणजे एक धगधगता निखारा , एक छोटासा ज्वालामुखी
कधी सुप्त कधी निद्रिस्त तर कधी पेरलेली ठिणगी
या 'सलाची ' 'लस ' कधी होते कळतही नाही
परिस्थितीची सुई जणू दुखालाच आत टोचू पाही
काळ जातो तसे काही सलही पुसट होत जातात
मागे ठेवून जातात व्रण ठळकपणे
असोनात का बापडे
या व्रनांमुलेच आपल्याला काहीतरी सलत होत
हे ध्यानात येत , अन मग कळत , की
सलण फक्त निमित्त असत ,
त्यातूनच दुख 'नव्याने ' भेटत !

----वैभव वसंत जोशी , पुणे
 
« Last Edit: April 17, 2013, 11:52:52 PM by vaibhav joshi »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: सल मनातला…
« Reply #1 on: April 18, 2013, 10:25:06 AM »
far chan mitra...mag tula ka prshn padala ahe ki kavita ka karavi?
 

Re: सल मनातला…
« Reply #2 on: April 19, 2013, 12:52:11 PM »
ekdum mast kavita ani true too... :)