Author Topic: अधिकार उरला नाही.....  (Read 961 times)

अधिकार उरला नाही.....
« on: April 19, 2013, 12:55:43 PM »
माझ्या हातात नेहमी हिरव्या बांगड्या असतात.. आवडतात मला..... अगदी हिरव्यागार  :) परवा एकदा कंपनीतून बाहेर पडताना एक गार्ड बाईंनी विचारलं... "काय madam अगदी हिरव्यागार बांगड्या.... छान आहेत.. मलाही खूप आवडतात....." मी सहजच म्हटलं घालत का नाही मग? allowed नाही का इथे?
माझ्या मनात काहीच न्हवत अगदी सहज विचारलं होत मी.... तिने पण हसतच उत्तर दिल....
"तस काही नाही... पण आता तो अधिकारच उरला नाही मला...."
पुढे काय बोलाव मला सुचेना.... तिथून बाहेर पडले... आणि गाडीवरून घरी जाताना जे काही सुचलं तेच इथे मांडलय..... आवडाव अस बिलकुल नाही... पण तरीही लिहिलंय.....

लाल भडक कुंकू आणि हिरवा चुडा...
तिला मनापासून आवडतो...
नुसत्या मंगळसूत्राने नटलेला गळा...
तिला आजही तितकाच भुलवतो.....

त्या दिवशी तिनेही घातला होता...
गर्द हिरवा चुडा.. पण शेवटचा...
या सावित्रीने तिच्या सत्यवानाला...
ज्या दिवशी निरोप दिला अखेरचा...

आता तिच्या दागिन्यांना असूनही...
काहीच अर्थ उरला न्हवता...
तिच्या डोळ्यांत अखंड साचलेला अश्रू...
तेवढाच काय तो शिल्लक होता....

कुणाचा हिरवा चुडा पाहिला...
तर आजही आईच्या पापण्या ओलावतात...
तिचही काळीज आक्रोश करत....
जेव्हा लेकुरवाळ्या पंचमीला आपल्या माहेरी जमतात....

नेहमी त्याच्यासाठीच करायची...
तो शृंगार तिने पुन्हा कधी केला नाही...
कोणी विचारलं... तर म्हणे...
या कुंकवावर आणि चुड्यावर. माझा अधिकार उरला नाही.....

रायामुळेच मिळालेलं सौभाग्य...
त्याच्याविना हिरावलं...
त्याच्यासोबत पाहिलेलं...
तीच प्रत्येक स्वप्न तुटत गेलं....

अंगणात खेळणारा चिमुकला...
तिला त्याची आठवण करून देतोय...
त्याच्याविना बेरंग तिच्या आयुष्यात...
हा बाळकृष्ण सुखाचे रंग भरतोय......

पिल्लासाठीच रोजचा दिवस...
ती पुन्हा नव्याने जगते आहे....
रायाला अखेरच्या क्षणी दिलेलं वचन...
त्याच्या आठवणीना सोबत घेऊन पूर्ण करते आहे....

डोळ्यांत साठवलेला प्रत्येक क्षण....
तिची अखंड सोबत करतोय...
पिल्लाच्या भविष्यासाठी लढताना..
राया आजही तिचा दृढ विश्वास बनून जगतोय....


- Shailja

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: अधिकार उरला नाही.....
« Reply #1 on: April 20, 2013, 04:15:06 PM »
आता तिच्या दागिन्यांना असूनही...
काहीच अर्थ उरला न्हवता...
तिच्या डोळ्यांत अखंड साचलेला अश्रू...
तेवढाच काय तो शिल्लक होता....

छान कविता!

Offline अशोक भांगे (सापनाई कर )

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
 • वेडी कविता कि वेडा मी , काही नाही फक्त शब्दांच्या चढाओढी
Re: अधिकार उरला नाही.....
« Reply #2 on: April 21, 2013, 11:20:02 AM »
chhan kavitta aahe.......

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: अधिकार उरला नाही.....
« Reply #3 on: April 22, 2013, 11:50:25 AM »
chan kavita aahe...pan ata kal badalat chalala aahe..tya pramane apan hi badalayla hav.