Author Topic: मूक साक्षीदार  (Read 555 times)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
मूक साक्षीदार
« on: April 23, 2013, 06:22:38 PM »
मूक साक्षीदार

रस्ते तेवढेच असतात
किती चालायचं
हे ज्याचं त्याचं प्राक्तन
फक्त
रात्रीचे ते भयाण आणि लांब  वाटतात
उन्हाचे चटके बसवतात
पावसाळ्यात घसरायला लावतात
थंडीत कुडकुडायला लावतात
मात्र
पहाटे  आणि संद्यासमयी
आल्हाद ,मुग्ध ,स्निग्ध
खूप छान  आणि हवेसे वाटतात
खरच
हे रस्ते बरंच काही शिकवतात
खरं तर
ते आहेत तिथेच असतात
आहे तेवढेच असतात
तरी सार्यांचे मूक साक्षीदार असतात
आपणच शेवटी
त्यांच्याही पुढे निघून जातो अज्ञातात
अज्ञानाच्या अंधकारात कि दिव्य प्रकाशात
तेही अज्ञात असतं
तिथून पुढं त्यांची साक्ष सुद्धा 
संपते …. आपण निघून जातो
रस्ते मात्र तिथेच असतात ……

……………स्वाती मेहेंदळे (एक भिजले वाळवंट …मधुन )

Marathi Kavita : मराठी कविता

मूक साक्षीदार
« on: April 23, 2013, 06:22:38 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: मूक साक्षीदार
« Reply #1 on: April 23, 2013, 09:55:11 PM »
swati madam ya kavitecha vishay changla ahe...ajvar vaatanvar khup vela vachle...
pahilyanda rastyavar kahi vachayla milale...abhari ahe...
shabda rachnechya abhavamule kavita vachyas kathin jate..
mi pratekala pratikriya yasathi post karto ki mala kahi chaan asa lihita yet nahi pan ek nav kavina
prosthahan milava manun.... :)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
Re: मूक साक्षीदार
« Reply #2 on: April 23, 2013, 11:41:04 PM »
Rudra ..Thanx !shabd rachanevar laksh dein!

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मूक साक्षीदार
« Reply #3 on: April 26, 2013, 10:54:23 AM »
हे रस्ते बरंच काही शिकवतात
खरं तर
ते आहेत तिथेच असतात
आहे तेवढेच असतात
तरी सार्यांचे मूक साक्षीदार असतात
आपणच शेवटी
त्यांच्याही पुढे निघून जातो अज्ञातात
अज्ञानाच्या अंधकारात कि दिव्य प्रकाशात

छान कविता आहे!  :) :) :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):