Author Topic: सांगा माझ्या मनाचे  (Read 698 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
सांगा माझ्या मनाचे
« on: April 25, 2013, 04:07:01 AM »
सांगा माझ्या मनाचे
दुःख मी कसे विसरुं
दुर्दैवा बरोबर मी
समझोता हा कसा करुं

जीवनाचे गीत सरले
बोल ओठांवरी निमाले
भेसूर त्या स्वरांचे
संगीत मी कसे करुं

चित्र ते साकारलेले
जीवन पटला वरले
जीर्ण त्या पटला वरती
रंग सांगा कसे भरुं   
                           रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/04/sad-poem.html

Marathi Kavita : मराठी कविता