Author Topic: कोंडी  (Read 736 times)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
कोंडी
« on: July 08, 2013, 11:13:29 PM »
कोंडी

कधी एक एक शब्दाची भ्रांत पडते

माणसा विना

घर ओस पडतं

शब्द आणि माणसांची

भीक मागावीशी वाटते

माणसाचं वेड असण्यापेक्षा

माणुसघाण्या  एकलकोंड्या

माणसांचा हेवा वाटतो

…भिंती  सुद्धा रुसतात

अचानक सौंदर्य….  काव्य सारे

पृथ्वीच्या गर्भात लुप्त होतात

जणु …. अवघ्या विश्वावर

आवस पसरते

'आदि' … 'अंत' हरवतात

सारे संदर्भ तुटतात

प्रश्नाचिन्हात

एक चेहेरा दिसतो

आपलासा वाटतो

तरी पूर्ण अपरिचित

उत्तर शोधण्याची गरज नसते

पण

कुठं  तरी

हि अवस्था संपवायची असते

'कोंडी 'फोडायची असते

म्हणून कदाचित फ्रस्ट्रेशन असावे

कदाचित डिप्रेशन असावे

असे म्हणून मोकळी होते

प्रश्न चिन्हाला  उशाशी घेऊन

निजण्याचा वृथा प्रयत्न करते  …… !

 ………………स्वाती मेहेंदळे


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कोंडी
« Reply #1 on: July 09, 2013, 03:50:20 PM »
प्रश्न चिन्हाला  उशाशी घेऊन

निजण्याचा वृथा प्रयत्न करते  …… !
shevati prashnchinhach....
 

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: कोंडी
« Reply #2 on: July 12, 2013, 10:49:15 PM »
छान जमली कविता  :)