Author Topic: ह्या जगात खरच प्रेम असते का...  (Read 2365 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
ह्या जगात खरच प्रेम असते का...
कधी कोण कोणासाठी झुरत का
ह्या जगात खरच प्रेम असतं का
मग का तुटतात अचानक नाती
मग का होतात मने वेगवेगळी
प्रेमाच्या नात्याला तितके महत्व नसते का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
प्रेमाच्या आणाभाका घेतात
जीवनभर साथ देण्याच्या शपथा घेतात
आणि मग अचानक मला विसरून जा
असेही म्हणून मोकळे होतात
मग शपथ घेतलेले प्रेम
हे प्रेमच असते का
ह्या जगात खरच प्रेम असते का
प्रेमासाठी वाट्टेल ते करतात
जन्मदात्यांना एकटे सोडून
आत्महत्या हि करतात
प्रेम असेच बळी मागते का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
कधी प्रेम नाही मिळालं तर स्वतः मरतात
कधी आपल्या प्रेमावर acid फेकतात
प्रेम इतके निष्टुर असते का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
कधी इज्जतीची पर्वा न करता
घर सोडून पळतात
कधी इज्जतीची पर्वा करत
प्रेमाचा बळी देतात
प्रेम हेच सर्व शिकवते का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
असे खुप प्रश्न आहेत त्याची उत्तरे नाहीत
ह्या प्रश्नांची उत्तरे कधी काही असतील का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
ह्या जगात खरच प्रेम असते का...

... प्राजुन्कुश
... Prajunkush.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
छान लिहितोस :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Dhanyavad Sunitaji...

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Prajunkush,
छान.....

होय खरं प्रेम असतंय कि :) …पण फार दुर्मिळ …. :(   
ते कधी तिच्या  नयनांत दिसतं  ….
तर कधी तिच्या शब्दांत जाणवतं ……
फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे….
आणि प्रत्येकालाच  ती कला अवगत असते असे नाही ……  :(

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Dhanyavad Milindji...

Mkmahadik

 • Guest
asata bahuda...
Mla tasa anubhav nahi...

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Dhanyavad...

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
khar prem aste yat vadch nahi prem hi ek bhavna aste ti khari havi prem jagan badlavun takat
pan khar prem karan khup kathin asat ....prem honyapeksha te tikavan KATHIN ASTE

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):