मैत्रीचाही जेंव्हा खरच कंटाळा येतो
ढग मनात दाटून, पाऊस डोळ्यात साचतो
साचलेला पाऊस मग हळू हळू सांडतो
घरांगळताना खाली तो स्वता: शीच भांडतो
घारांगळालेला प्रतेक थेंब काहीतरी सांगत असतो
फुटलेले मनाचे बांध कसेतरी बांधत असतो
बांध बंधाताना जेंव्हा बांधच त्याबरोबर वाहतो
वाहताना तो बघणं हाच एक मार्ग उरतो
पण कधी कधी असहि घडतं
ढग नुस्तेच दाटून येतात, डोळे सुद्धा पानावतात
तोवर सैरा-वैरा धावत, अचानक वारा येतो घोंगावत
आलेले ढग स्वत: सोबत घेऊन, भर्रकन निघून जातो
परत ढगांची वाट पाहणं, फक्तघ हाच पर्याय राहून जातो
मैत्रीचाही जेंव्हा खरच कंटाळा येतो....
--------संभाजी--------