Author Topic: आई  (Read 902 times)

Offline Rahul Kaware

  • Newbie
  • *
  • Posts: 15
    • Rahul Kaware
आई
« on: August 06, 2013, 04:15:38 PM »
या कवितेची मध्यवर्ती कल्पना मला जळगाव - अमरावती प्रवासा दरम्यान एका हिंदी कवितेवरून सुचली. 
ती कागदावर न उतरवता मी रेल्वेच्या बाकावर लिहून ठेवली होती , दुसर्या दिवशी जाऊन तो बाक शोधणं आणि सगळ्यांसमोर ती एका कागदावर लिहून घेणं हा किती हास्यास्पद अनुभव असेल याची तुम्ही  कल्पना करु शकता…आणि म्हणूनच ही कविता माझ्यासाठी संस्मरणीय आहे !


कलीच्या दुकानात त्याने एकदा विकायला ठेवले होते नाते …
प्रत्येकालाच मग तिथे उघडायला हवे होते खाते !

पैसे टाकून बाप-बहिण-भावासारखी मिळत होती नाती …
आजी आजोबा, काका मामा यांनीही भरली होती पोती !

बायकोला माझ्या मग जावसं वाटलं त्या दुकानात …
होता तिचाही विश्वास या विकतच्या नात्यांत !

गेल्याबरोबर आत मला म्हणाला दुकानदार,
"काय हवंय भाऊसाहेब ? नाती सगळीच मिळतात…
मुलगा देऊ का मुलगी ??
आहेत आमच्याकडे जावई अन सूनही…

सुचेना मला बोलावं काय …
कलीच्या या गुलामाला आता मागवं तरी काय???

बायको आता गुंतली होती भावाच्या तोलामोलात . 
हळूच मग मी म्हणालो दुकानदाराच्या कानात …
"राजा मला हवीये रे आई … "
डोळ्यात पाणी आणून तो मला म्हणाला,
"माफ करा दादा, हे नातं विकायला नाही…
किंमत सांगेल त्याची असा कुणी अजून तरी मला भेटलेला नाही …"

म्हणालो त्याला,"जाऊ दे राजा, मीच वेडा…
कळलंय मला पैशानं विकत मिळत नसतं सर्वकाही…
आणि तसंही,
भावनाहीन जगात आज या, हवीय कुणाला रे आई ??? "

-राहुल राजेंद्र कावरे,
  अमरावती

http://rahulkawarekavita.blogspot.in
« Last Edit: August 06, 2013, 08:27:38 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आई
« Reply #1 on: August 07, 2013, 12:03:29 PM »
 "माफ करा दादा, हे नातं विकायला नाही…
किंमत सांगेल त्याची असा कुणी अजून तरी मला भेटलेला नाही …"

फारच छान....... :)