Author Topic: अघटित  (Read 794 times)

Offline Omkarpb

  • Newbie
  • *
  • Posts: 42
  • Gender: Male
अघटित
« on: August 10, 2013, 07:51:06 PM »

कधी कधी वाटते मजला ,
जे घडले ते जर कधीच घडले नसते ……


काटेरी पथ आज गुलाबी झाले असते
वळणावळणाचे ते आज सरळ राहिले असते
जे घडले ते जर कधीच घडले नसते ……

ह्या उदासीन खोलीत हास्य उमटले असते
कोंडलेले मन आज चौफेर उधळले असते
जे घडले ते जर कधीच घडले नसते ……

डोक्याचे ओझे हलकेच विरून गेले असते
प्रसन्न बागेच्या बाकावरती सूर्यास्त बघितले असते
शांत निरव रस्त्यावरती उगाच भटकले असते
सागरी लाटांच्या ठेक्यांचे श्वास भरून घेतले असते
ते जर कधीच घडले नसते …. !!!

- ओंकार
« Last Edit: August 11, 2013, 04:22:55 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता