Author Topic: पराजयी जाळ्यात  (Read 849 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
पराजयी जाळ्यात
« on: August 12, 2013, 11:35:40 PM »
दुःखाची वलय
हृदयाच्या खड्यात
स्वप्नांची प्रेत
कुजतात  त्यात

प्रारब्धाचे पक्षी
पराजयी जाळ्यात
रक्ताळला पाय
एकेका धाग्यात

उरी तडफडात
फक्त तडफडात
कोंडलेला उंदीर
फसव्या जाळ्यात

देवाचा धावाहि
हाकेच्या अंतरात
भोवताली आपली
परक्या नजरेत

यालाही काय
जीवन म्हणतात
कश्यास  चाले 
व्यर्थ यातायातविक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 12:59:14 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता