Author Topic: फेसबुकच्या या मायावी जगात.....  (Read 2053 times)

फेसबुकच्या या मायावी जगात,
बरेच काही शिकलोय मी,
मिळवले चार जिवलग मित्र,
बरेच काही गमावले मी.....

फेसबुकच्या या मायावी जगात,
बरेच काही प्रेमविषयी लिहले मी,
दुस-यांना प्रेम वाटत राहीलो,
स्वतःचे प्रेम वाचवू शकलो नाही मी.....

फेसबुकच्या या मायावी जगात,
बरेच काही वाचले मी,
स्वतःचे आयुष्य उध्वस्त करुन,
दुःखाना शब्दात उतरवले मी.....

फेसबुकच्या या मायावी जगात,
ब-याचवेळा इतरांशी भांडलोय मी,
फेसबुकची भांडणे फेसबुकपुरतीच मर्यादीत ठेवली,
सिरीअसली कधीचं घेतले नाही मी.....

फेसबुकच्या या मायावी जगात,
बरेच मैत्रिणी मित्र जमवले मी,
मैत्रिणी तर मोजक्याच टिकल्या,
पण मित्र मात्र ग्रेट मिळवले मी.....

फेसबुकच्या या मायावी जगात,
बरेच कटू गोड अनुभव घेतले मी,
काही मनात राहीले काही ह्रदय,
तर काही डोक्यात साठवले मी.....

तात्पर्य : खरचं फेसबुकच जग निराळं असतं,
आपण सगळ्यांचे असतानाही.....
ईथे आपलं कोणीचं नसतं,
तरीही जग फेसबुकच्या मायाजाळात फसतं.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: August 19, 2013, 10:21:14 AM by ssonawane100@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
mastach re ...

arpita deshpande

 • Guest
खरचं फेसबुकच जग निराळं असतं,
आपण सगळ्यांचे असतानाही.....
ईथे आपलं कोणीचं नसतं,
तरीही जग फेसबुकच्या मायाजाळात फसतं.....:'(

Bhushan Kasar

 • Guest
Ekdam Mast aahe .....

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
फेसबुकचं फेस थोड रुसल आहे,
वापरून सुद्धा त्याला
तुमच मात्र मस्त आहे,
नका म्हणू फेसबुक मायाजाल आहे...
बुक आहात तिथं,
म्हणून तुम्हाला फेस आहे !शिवाजी.....