Author Topic: रोज़चा बलात्कार  (Read 1451 times)

Offline sharktooth19

  • Newbie
  • *
  • Posts: 34
रोज़चा बलात्कार
« on: August 21, 2013, 01:51:18 AM »
आजकाल होनारे बलात्कार हे वाईटच, परंतु  नवर्‍याचे बायकोवर होनारे रोजचे बलात्करही कही कमी नाहीत..

आरश्यासमोर सकाळी
उभे राहण्याची हिंमत नव्हती
काय सांगू त्याला
मलाच माझ्या शरीराची किंमत नव्हतीकाल तू होता फक्त एक पुरूष,
मी तुझी "बायको" मात्र होती.
तुझ्या सहवासातील कालची
आणखी एक दुखरी रात्र होती


मला बोलायची सोय नव्हती,
कारण तुझा मूड होता.
तुझ्या दिवसभरच्या षन्ढपणाचा
तू माझ्यावर घेतलेला सूड होता.


सवयीचाच भाग असावा,
मला याचे काहीच कसे वाटले नाही?
स्वतःचाच बलात्कार पाहाताना,
डोळे सुद्धा मी मिटले नाही.


कदाचित..
जन्मोजन्मी  बायकोच्या अंगावर
नवार्‍याने दिलेले वळ असतील.
कदाचिततुही अश्याच,
अश्याच एका बलात्काराचे फळ असशिल..
« Last Edit: August 29, 2013, 03:55:13 PM by sharktooth19 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sharktooth19

  • Newbie
  • *
  • Posts: 34
Re: रोज़चा बलात्कार
« Reply #1 on: August 29, 2013, 03:56:42 PM »
:(