Author Topic: सूट  (Read 725 times)

Offline sudhanwa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
  • Gender: Male
सूट
« on: August 30, 2013, 11:39:32 AM »
सूट हा शब्द इतका सूटसूटीत असेल असं वाटलं नव्हतं….

भाजीपाल्यावर सूट
सूटकेस वर सूट
सूटावर बूट अन्
बूटावर सूट

अॅडमिशन घेताना, जातींवर सूट
पेपर लिहताना, ५ पैकी ४ प्रश्न साेडविण्याची सूट
काठावर नापास होताना,
ग्रेस मार्किंगची सूट

३० दिवसांत, ४ शनिवारांची सूट
बेंचवर बसून, पगार घेण्याची सूट
नोकरी असूनही, फ्रीलान्स करण्याची सूट

भक्तिभावाला नवसांची सूट
दिमाखदारांना दर्शनरांगेची सूट

हॅप्पी आवर्समधे, दारूवर सूट
पबमध्ये, ‘कपल’वर सूट

विचारांची सूट
बडबडण्याची सूट
राग आला कुणाला त्याचा
तर पळत सूट

करात सूट
कर्जात सूट
तारणात सूट

अम्ब्युलन्सला; सिग्नलची सूट
लाल बत्तीला; टोलवर सूट

सरकारी कचेरीत; भ्रष्टाचारावर सूट
कोर्ट कचेरीत; जामिनावर सूट

कळलयं कुणाला का या सूटीमागचं कूट?
कळलयं कुणाला का या सूटीमागचं कूट?

Marathi Kavita : मराठी कविता