Author Topic: रात्र आरंभ  (Read 1268 times)

Offline pankh09

 • Newbie
 • *
 • Posts: 41
रात्र आरंभ
« on: September 23, 2013, 10:41:53 PM »
कैक वादळांची शांतता पांघरून, रात्र पडली आहे निचपित….
स्पंदनांचा आवाज देखील भेसूर वाटेल तिला कदाचित…

नजरेच्या टप्प्यात…. फक्त भयाण काळोख…
फडफडणाऱ्या दिव्याची…. ती केविलवाणी तगमग….

वाऱ्यासव झुलणाऱ्या, कोमेजलेल्या... फुलांना घेवून….
उभी आहेत निष्प्राण झालेली झाडांची प्रेते…

खुल्या स्वातंत्र्याची…बंदिस्त अभिव्यक्तीची…
सलणाऱ्या भूतकाळाची…निमूट स्वीकारलेली गुलामी…

प्रत्येक दिवस खेचून नेतो मागे अडकलेला जीव…
आणि रात्र…. ही क्रूर रात्र परत नेते आरंभी…

- पंकज
२२-०९ -२०१३
« Last Edit: September 23, 2013, 10:46:54 PM by pankh09 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: रात्र आरंभ
« Reply #1 on: September 27, 2013, 11:37:21 AM »
छान.... :(

Offline vinod.patil.12177276

 • Newbie
 • *
 • Posts: 45
Re: रात्र आरंभ
« Reply #2 on: September 27, 2013, 05:57:31 PM »
छान आहे....

Offline vinod.patil.12177276

 • Newbie
 • *
 • Posts: 45
Re: रात्र आरंभ
« Reply #3 on: September 27, 2013, 06:00:00 PM »
छान आहे....