Author Topic: सत्तेच्या दुधावर वाढलेल्या राजकुमारा  (Read 920 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
सत्तेच्या दुधावर वाढलेल्या राजकुमारा
सलामांच्या झुल्यावर जोजवल्या राजकुमारा
तुला इथले दु:ख कधी तरी कळेल का ?
सोन्याचे पाय तुझे या मातीचे होतील का ?

त्या सगळ्यांना वाटते तूच आहेस कैवारी
सत्तेचे भुके करती तुकड्यासाठी लाचारी
इच्छा असो वा नसो तुला ते द्यावेच लागेल 
त्यांच्यासारखा होशील तू शेवटी असेच घडेल

कधी कधी मला तुझी फार कीव वाटते
जगणे कारण तुझे हे तूझे कधीच नसते
ठरलेले गुलाम तुझे ठरलेले सलाम कारण 
नशिबाने आलास तू घेवून शापित वरदान

 
विक्रांत प्रभाकर


 
« Last Edit: April 19, 2014, 12:49:01 AM by MK ADMIN »