Author Topic: तू भेटत रहा  (Read 1194 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
तू भेटत रहा
« on: October 12, 2013, 02:38:33 PM »
तू भेटत रहा

(Mr. Vinayak Ujalambe)

तू भेटत रहा ,
कधी शांत गार वा-यातून .
कधी चांदण्यांच्या पसा-यातून ..

तू भेटत रहा ,
कधी पावसाच्या पहिल्या भिजेतुन..
कधी लख्ख विजेतून..

तू भेटत रहा ,
कधी इन्द्रधनुच्या सज्जेतुन..
कधी नववधुच्या लज्जेतुन ..

तू भेटत रहा ,
कधी विरहाच्या अंगारातून ..
कधी मिलनाच्या श्रुंगारातून ..
   

तू भेटत रहा ,
कधी स्थितप्रज्ञ ध्यानातुन..
कधी चंचल विज्ञानातून..

तू भेटत रहा ,
कुणा माउलीच्या डोळ्यातून..
कधी तिच्या मात्रुत्वाच्या सोहळयातून..

तू भेटत रहा ,
पापण्याआड अश्रुंच्या साठवातुन
डोंळयाआड जपलेल्या आठवातुन..

तू भेटत रहा ,
अबोल शांत चांदण्यातुन
ग्रीष्माच्या कठोर भाजण्यातून..

तू भेटत रहा ,
अर्जुन झालो.. तर कृष्णसखा बनुन..
झालोच दुर्योधन... तर कर्ण पाठीराखा बनुन ..

तू भेटत रहा.....!!!


« Last Edit: October 12, 2013, 02:42:22 PM by shashaank »

Marathi Kavita : मराठी कविता