Author Topic: दुष्काळ दुपारी ...  (Read 715 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
दुष्काळ दुपारी ...
« on: October 12, 2013, 05:15:53 PM »
पाउलवाटेवर त्या गेलो
बोरीचे झाड तेच होते,
फरक इतकाच होता,
झाडाला बोरही नव्हते !!

डींक बाभूळ फुलांचा ,
मन चौखूर शोधीत होते,
दुपारी डोळ्यांना तेव्हा,
काटेच बोचत होते !!

पाणवठ्यावर गुरांच्या,
घुंगरु सांडले होते,
डोळ्यात फांदीवरल्या,
दवबिंदु गोठले होते !!

सुकवून वारे नभांना,
एकाकी निशब्द होते,
सुपही माजघरात,
जात्यावर झोपले होते !!© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
« Last Edit: April 28, 2017, 06:41:50 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता