Author Topic: ते पिंपळाचं झाड  (Read 948 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
ते पिंपळाचं झाड
« on: October 15, 2013, 10:34:51 AM »
आपण काहीतरी बघतो आणि आपल्या मनात काही स्पंदन निर्माण होतात. त्या स्पंदनाना आपण कवितेत बांधायचा प्रयत्न करतो. पण नेमकी बांधणी किंवा शब्द सापडत नाहीत. मग आपण काहीतरी वाचतो अन अचानक आपल्या मनात राहिलेलं ते अपूर्ण पूर्ण होतं. असाच अनुभव मला सौ. मनीषा सिलम  ह्याचा ''मनाच्या काठावरून'' हा कविता संग्रह वाचला आणि आला.
 
 त्याचं असं झालं कि एका इमारतीवर वाढलेलं एक पिंपळाचं झाड मी बघितलं अन मनात आलं “हे असं एकाकी का वाढत असेल?’’ पण त्यापुढे काही सुचेना.  सौ. मनीषा सिलम  ह्याचा ''मनाच्या काठावरून'' मधील "शाप'' हि कविता वाचली अन माझ्या त्या खुंटलेल्या विचारांना  शब्दरूप मिळालं. तीच कविता इथे पोस्ट करत आहे.   
 
 ते पिंपळाचं झाड
 
 कॉक्रीटच्या रुक्ष भिंतीवर
 उगवलेलं ते पिंपळाचं झाड.
 खाली खोल राहीलेली जमीन
 अन उंच डोक्यावर आभाळ.
 
 खाली एकत्र डोलणारी झाडं
 जमिनीत घट्ट उभी असलेली.
 अन भिंतीवर एकटच वाढणारं
 ते पिंपळाचं झाड अधांतरी. 
 
 गटारीचं मुबलक पाणी पिउन
 हिरवी गच्च झालेली झाडं.
 अन पाण्याच्या एका थेम्बाकरता
 मुतारी फोडून घुसलेली पिंपळाची मुळं.
 
 जमिनीवर ते सगळे एकत्र ....
 अन भिंतीवर हे एकटं.
 तरीही वाढतंच आहे ते......
 निरुद्देश...........?
 
 ह्याला आयुशाचा चिवटपणा म्हणू?
 की मरण हाती नसल्यानी
 जगण्याची अपरिहार्यता म्हणू?
 
 केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: ते पिंपळाचं झाड
« Reply #1 on: October 15, 2013, 02:12:09 PM »
वा छानच हो !!तुमच्याच शब्दात सांगायचे तर ,,,,जहा न पहूचे रवी ,,वहा पहूचे कवी !!!! :) :) :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ते पिंपळाचं झाड
« Reply #2 on: October 17, 2013, 03:42:21 PM »
ह्याला आयुशाचा चिवटपणा म्हणू?
 की मरण हाती नसल्यानी
 जगण्याची अपरिहार्यता म्हणू?

chan..... :)