Author Topic: आता सुरु नव्याने माझा प्रवास झाला  (Read 1095 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा

तोडून बंध सारे सुटण्या प्रयास झाला
आता सुरु नव्याने माझा प्रवास झाला

थकलो पळून जेंव्हा बसलो जरा घराशी
माझाच भार तेंव्हा माझ्या घरास झाला

ते बंध रेशमाचे, ते पाश सोयऱ्यांचे
या प्रेम भावनांचा मजलाच पाश झाला

सोसून घाव आलो जिंकून देश सारा
मजला फितूर तेंव्हा माझाच श्वास झाला

खांद्यावरून त्यांच्या गेली वरात माझी
याचाच हाय त्यांना भलताच त्रास झाला

त्यांनी अमृत पिऊनी मजला दिले हलाहल
''केदार'' नाव माझे, याचाच त्रास झाला

केदार...........with Swamiji...

या गझलितला 'आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला' हा मिसरा श्री सारंग भणगे यांच्या गाझलीतला आहे 
 
« Last Edit: October 30, 2013, 11:13:06 AM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
ते वृत्त काय ते ऊमजण्या पलीकडे आहे
पण शब्द रचना अप्रतिम :-)