Author Topic: बोच  (Read 2012 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
बोच
« on: November 18, 2013, 10:28:30 AM »
वजनी बोली सुचली नाही
मतल्या मध्ये दिसली नाही
 
गझल लिहाया गेलो ''तर ही''
ओळ एकही जमली नाही
 
''दुष्काळा'' वर शेर ओतले
जमीन त्यांची भिजली नाही
 
''भक्ती'' ने मी गझल टाकली
मात्रां मध्ये बसली नाही
 
प्राशुन ''अमृत'' अमर म्हणाले 
लगावली ही पटली नाही
 
बघुन ‘’बेवडा’’ बोललेच ते
''हजल बुवा ही जमली नाही''
 
गझल हत्ति अंधळ्यां भोवती
मते कुणाची जुळली नाही
 
रदीफ मतले किती प्यायलो
गझल नशा ही विटली नाही
 
भाव जुळले गझलेशी जरी
गझलच माझी उरली नाही
 
हलाहला ‘’केदार’’ पचवितो
बोच टिकेची पचली नाही
 
 
केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: बोच
« Reply #1 on: November 18, 2013, 11:51:25 AM »
bochari boch, mitra, chaan :D

jawahar doshi

 • Guest
Re: बोच
« Reply #2 on: November 19, 2013, 12:47:45 AM »
Kedar saheb, you are toooooo good. I am regular visitor to M.K. But I am not well conversant to FB. I am a big Fan of your Kavitas. Whatever you write, is mind blowing. I would like to meet you at least once. Hope you contact me on my email. Thanks...

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: बोच
« Reply #3 on: December 08, 2013, 10:24:47 PM »

मस्त !खूपच छान !माझ्याच मनाचा गोंधळ दिसला मला ह्या कवितेत . एक गझल लिहायचा प्रयत्न केला ,fb वर पोस्ट केली पण कुणाची टीका सुद्धा नाही . अश्याने आम्ही कसे बरे शिकणार ?

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: बोच
« Reply #4 on: December 08, 2013, 11:15:56 PM »
खरच आहे, कलाकार कधीच समाधानी नसावा, कारण समाधान आले कि सुस्ती येते, आणि कलाकार संपतो अशी माझी धारणा आहे, असमाधानातून नव निर्मिती होत रहाते!

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: बोच
« Reply #5 on: December 11, 2013, 11:41:05 AM »
ha....ha....ha.... :D :D :D

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: बोच
« Reply #6 on: December 11, 2013, 08:28:31 PM »
मिलिंदा, चुकीचं म्हटलं कारे मी......?